ग्रामपंचायत देवपे (ता. मुरबाड, जि. ठाणे – ४२१४०१) ही मुरबाड तालुक्यातील एक ग्रामीण व कृषिप्रधान ग्रामपंचायत आहे. देवपे गावासह नांदेणी व पशेनी ही गावे ग्रामपंचायत देवपेच्या कार्यक्षेत्रात येतात. गावाचा मुख्य व्यवसाय शेती असून ग्रामीण जीवनशैली व स्थानिक सहभागाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला जात आहे.
ग्रामपंचायत देवपेची एकूण लोकसंख्या १३७९ असून सुमारे ४३२ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. गावाचा साक्षरता दर ८७% असून एकूण क्षेत्रफळ १२४ हेक्टर आहे.
ग्रामपंचायत देवपे ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामविकास, नागरिक सेवा व शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाते.
सरपंच:
सौ. रंजना रमेश धुमाळ : 9325546617
उपसरपंच:
सौ. प्रगती संजय सांबरे : 7218446044
ग्रामपंचायत अधिकारी:
श्री. अभिषेक संतोष साबळे
📞 मोबाईल: ९८३४९९६४४९
गटविकास अधिकारी (BDO)
ग्रामपंचायत अधिकारी
सरपंच
उपसरपंच
ग्रामपंचायत देवपे
ता. मुरबाड,
जि. ठाणे – ४२१४०१
📧 ई-मेल: grampanchayatdevape@gmail.com
📞 संपर्क:
ग्रामपंचायत अधिकारी – अभिषेक संतोष साबळे
मो. ९८३४९९६४४९
ग्रामपंचायत देवपे अंतर्गत खालील मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत —
ग्रामपंचायत भवन, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य उपकेंद्र, डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र).
जिल्हा परिषद शाळा:
देवपे, नांदेणी, पशेनी
ग्रामपंचायत देवपे अंतर्गत एकूण ३ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत —
देवपे, नांदेणी व पशेनी.
ग्रामपंचायत देवपे अंतर्गत खालील शासकीय योजना राबविण्यात येतात —
जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, महिला बचतगट / उद्योजकता योजना, जन मन योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना इत्यादी.
ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे ₹ ९,५०,०००/- असून तो पुढील कामांसाठी वापरण्यात येतो —
प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती, ५% दिव्यांग कल्याण, १०% महिला व बालकल्याण, १५% मागासवर्गीय कल्याण, रस्ते, पशुसंवर्धन, कृषी, गटारे, स्मशानभूमी, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर बाबी.
ग्रामपंचायत देवपे मध्ये हनुमान मंदिर व गणपती मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत.
गावात होळी व दिवाळी हे सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
ग्रामपंचायत देवपे अंतर्गत सौर दिवे बसविण्यात आले असून पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्यात येतो. गावात स्वच्छतेसाठी नियमित उपक्रम राबविले जातात.
ग्रामपंचायत देवपे अंतर्गत खालील महिला बचत गट कार्यरत आहेत —
श्री गणेश महिला बचत गट
यशोधरा महिला बचत गट
महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार व आर्थिक स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
ग्रामपंचायत देवपे मार्फत खालील नागरिक सेवा पुरविल्या जातात —
जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र दाखला, ग्रामपंचायत येणे नसल्याचा दाखला, नमुना नंबर ८ उतारा (मालमत्ता कर आकारणी नोंदवही), जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र, दिव्यांग कल्याण योजनांचे अर्ज, मनरेगा मजूर नोंदणी अर्ज, महसूल विभागाच्या सामाजिक अर्थ सहाय्य योजना, घरकुल अर्ज, नळजोडणी अर्ज, ऑनलाइन तक्रार फॉर्म, नागरिक फीडबॅक फॉर्म.
मुरबाड पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे
मुरबाड पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.
अलीकडील बातमी
Murbad Panchayat Samiti